Sunday, January 15, 2017

पहिले शब्दातीत

            आजुबाजुला घडणारे रोजचेच प्रसंग
शब्दांनी करायचंय त्यांच्यावर व्यंग.
             आरक्षण, राजकारण, प्रदुषण, बलात्कार
शब्दांनी कसे करु मी त्यावर वार?
              आभाळ, चंद्र, समुद्र, हिरवळ, वारा
शब्दांत सामावून घ्यावा निसर्ग सारा.
              आईची माया आणि वडिलांचे आशिर्वाद
शब्दांतून घालायची आहे नात्यांना साद.
             ‘ति’च्यासह सगळं पूर्ण, ‘ति’च्याशिवाय रिक्त
शब्दांतून प्रेम माझं होईल का व्यक्त?
              शब्दांतून खूप सांगतो मी, तरी काहीतरी उरे.
मनातलं सगळं सांगायला, शब्द पडतात अपूरे.
               शब्द नाही पुरत म्हणून मन होतं व्यथित.
शब्दांतून तरी मांडतो मी, जे आहे ‘शब्दातीत’